येरळवाडीत 70 हजार रुपयांचा पावणे पाच किलो गांजा जप्त

Admin
By -

 

येरळवाडीत 70 हजार रुपयांचा पावणे पाच किलो गांजा जप्त

वडूज- खटाव तालुक्यातील वडूज पोलीस ठाणे हद्दीतील  येरळवाडी गावचे हद्दीतील ज्वारीच्या शेतीमध्ये गांजा आम्ली पदार्थाच्या झाडाची लागण केली असल्याच्या गोपनिय माहिती नुसार वडूज पोलीस ठाणे पथका मार्फत कारवाई करुन आरोपी यास ताब्यात घेवून त्याचे कडून ७०,५०० /- रु. किंमतीचा सुमारे पावणे पाच किलो गांजा मुद्देमाल जप्त केला आहे.

श्री. समिर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड व वाहतूक करणारे इसमांचे विरुद्ध कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे वडूज पोलीस ठाणे यांना दिलेल्या आहेत.

श्री.शहाणे प्रभारी अधिकारी वडूज पोलीस ठाणे यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत गोपनिय माहिती मिळाली कि, वडूज पोलीस ठाणे हद्दीत मौजे येरळवाडी गावी रानमळा नावाचे शिवारात ज्वारीचे शेतात  बाबासो गंगाराम जाधव रा. येरळवाडी ता. खटाव जि. सातारा याने अंमली पदार्थ गांजाच्या झाडाची लागवड केली असून त्याची तो जोपसना करीत आहे. वडूज पोलिसांनी या ठिकाणी छापा कारवाई केली. तहसीलदार बाई माने या सुद्धा घटना स्थळी उपस्थित होत्या.

बातमीच्या ठिकाणी छापा कारवाई करुन सदर इसम  जाधव रा. येरळवाडी ता. खटाव व त्याने ज्वारीचे शेतात अंमली पदार्थ गांजाच्या झाडाची लागवड केलेली झाडे असा एकूण ४.७६५ किलो ग्रॅम वजनाचे व ७०,५०० /- रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त करुन त्याचेविरुद्ध वडूज पोलीस ठाणे गुरनं. ६४/२०२४ अंमली पदार्थ औंषधी द्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम कलम ८, २० (अ) (ब) (२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत  पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, सचिन मिलारी, पोलीस अंमलदार शिवाजी खाडे, नवनाथ शिरकुळे, सत्यवान खाडे, पुष्कर जाधव, द-याबा नरळे, जयदिप लवळे, गजानन वाघमारे, चालक किरण चव्हाण यांनी सहभाग घेतला . सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे करीत आहेत.