रामोशी समाजाच्या २५ संघटना एकत्र करून लढा देणार : रामदास धनवटे

Admin
By -

 


रामोशी समाजाच्या २५ संघटना एकत्र करून लढा देणार : रामदास धनवटे 

दहिवडी, ता.१६

     सरकारने रामोशी समाजाची आतापर्यंत आश्वासने देऊन वारंवार फसवणूक केली आहे. परंतु आत्ता  रामोशी समाजाच्या २५ संघटना एकत्र करून जोपर्यंत समाजहिताचे निर्णय होणार नाहीत तोपर्यंत  लढा सुरूच ठेवणार असे प्रतिपादन बेरड-बेडर रामोशी समाज संघटनेचे अध्यक्ष रामदास धनवटे यांनी दहिवडी येथील आयोजित जनजागृती अभियानवेळी केले.


यावेळी उपस्थित एम. एम मदने,जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पोपटराव खोमणे, संजयनाना जाधव, बदामान्ना माकर,आप्पा चव्हाण, संजय चव्हाण, अनंता चव्हाण इत्यादी उपस्थित होते.




पुढे बोलताना रामदास धनवटे म्हणाले कि सरकारने आतापर्यंत समाजाचा मतासाठी वापर केला. आरक्षणासाठी अनेकदा आश्वासने दिली.परंतु इथून पुढे २५ संघटना एकत्र घेऊन मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा कडक इशारा दिला.


आप्पासाहेब चव्हाण बोलताना म्हणाले कि सरकारने आतापर्यंत रामोशी समाजाला झुलवत ठेवले आहे. आम्हाला चोर दरडखोर ह्या नजरेतून सरकार अजून पाहत आहे. आमच्यातील काही जणांवर खोटे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी सांगितले होते आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपये देऊ. आतापर्यंत पाच रुपये सुद्धा दिले नाहीत त्यामुळे या सरकारवर आम्ही नाराज आहे या निवडणुकीत निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.

         जेजुरी खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे म्हणाले कि मागील काळामध्ये आमच्याकडूनच काही चुका झाल्या आहेत. आरक्षणासंबंधीत असेल किंवा समाज एकत्रित करण्यामध्ये असेल. मात्र आता आम्ही समाज हितासाठी सर्व संघटना एकत्रित करून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी समाजातील सर्व युवकांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

    एम. एम मदने बोलताना म्हणाले कि.आता समाजाच्या सर्व संघटना हेवे दावे लांब ठेऊन एकत्र येतोय कारण समाज हितासाठी एकसंघ राहणे गरजेचे आहे.समाजातील युवकांनी देखील एकत्र येऊन प्रगती करूया असे आवाहन त्यांनी केले.


चौकट........

भारतीय जनता पार्टीने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचे आराध्य दैवत राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी निधी देऊ अशा आश्वासन देऊन देखील आमची फसवणूक केली आहे. आतापर्यंत भाजपाने समाजाची फसवणूक  केलीच आहे परंतु उमाजी नाईक यांची पण फसवणूक केली. येत्या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून देऊ. आशा प्रतिक्रिया आणि कार्यकर्त्यांनी दिल्या.


दहिवडी : माणमधील युवकांना मार्गदर्शन करताना रामदास धनवटे, व्यासपीठावर उपस्थित एम. एम. मदने, पोपटराव खोमणे, आप्पा चव्हाण संजय नाना जाधव, संजय चव्हाण, इत्यादी..