मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी म्हसवडला उत्स्फूर्तपणे बंद

Admin
By -



 


दहिवडी दि:मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या म्हसवड बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सकाळपासूनच सर्व दुकाने बंद होती. मराठा आरक्षणासाठी नेहमी गजबजलेल्या बसस्थानक चौक, महात्मा फुले चौकतही कमालीची शांतता होती. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे उपोषण करत असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु येथील सकल मराठा समाजाने बुधवारी येथील आठवडा बाजार असल्याने कालचा बंद आज गुरुवारी ठेवण्यात आला होता. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होता.

शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते.