*विनापरवाना वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल*

Admin
By -



 *विनापरवाना वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल*

दहिवडी दि:माण तालुक्यातून फलटणच्या कत्तल खाण्यासाठी विनापरवाना १९ वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विडणी येथील शरद गाडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली शाहीद रशीद कुरेशी राहणार मंगळवार पेठ, फलटण  गुन्हा दाखल झालेल्याच नाव आहे.

         दहिवडी पोलीस स्टेशनकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दहिवडीतील सिध्दनाथ मंदिर ते माणदेशी पत्रा डेपोच्या दरम्यान गोंदवले रोडवरून पिकअप क्र. एम. एच.११ ए. जी. ७१४४ मधून जर्सी जातीची वासरे आणि म्हशीची लहान रेडके  अशी एकूण १९ लहान वासरे दाटीवाटीने भरून कत्तलखान्यात घेऊन चालले होते. या प्रकाराबाबत विडणी येथील शरद गाडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शाहीद रशीद कुरेशी (मंगळवार पेठ, कुरेशी नगर, फलटण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप आणि १९ वासरे मिळुन ०३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



माण तालुक्यातील अनेक भागातून फलटणच्या कत्तलखान्यासाठी जनावरांची राजरोसपणे निर्यात होत असल्याची चर्चा माणमधील लोकांकडून ऐकायला मिळत आहे.

            कत्तलखाना मालकांनी माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे एजंट निर्माण केले आहेत या एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल दाराने जनावरांची खरेदी केली जाते काही ठिकाणी या एजंटच्या मध्येच किमतीवरून वाद निर्माण होत असल्याचे समजत आहे त्यामुळे माणमधील शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा असलेले पशुधन वाचले पाहिजे,अशा भावनाही व्यक्त होत आहेत.