हजर होताच अवैध धंदेवाल्यांना सखाराम बिराजदारांचा दणका

Admin
By -

 वरकुटे मलवडी कारवाई



 

दोन दिवसात पन्नास हजार रुपयाची दारू केली जप्त 


           दहिवडी दि:गेले चार महिन्यापासून सर्वात जास्त मोठे क्षेत्रफळ असलेले व अतिसंवेदनशील पोलिस ठाणे म्हणून जिल्ह्यात ओळखले गेलेल्या म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार काही दिवस प्रभारी अधिकारी यांचेकडे होता.


 अनेकवेळा मागणी केल्यानंतर तब्बल चार महिन्यानंतर म्हसवड पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी अधिकारी म्हणून सखाराम बिराजदार यांनी पदभार घेताच अवैध दारू विक्रीवर धाडसत्र सुरू करत सलग दोन दिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळदेव,जांभुळणी तीन ठिकाणी व वरकुटे मलवडी या ठिकाणी धाडी टाकून तब्बल ४९ हजार रुपयेची दारू जप्त केल्याने दारु व्यावसायिकासह दोन नंबर व्यावसाय करणारे मटका, जुगार, कल्ब, ताडी, रोडरोमीओ, छेडछाड करणारे टवाळ खोराचा, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून दहशत पसरवणार्यांचा बंदोबस्त नव्याने हजर झालेल्या सपोनि सखाराम बिराजदार बंदोबस्त करून पोलीस ठाण्याच्या हद्दीचे आवाहन पेलणार का ❓याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सातारा जिल्ह्यात म्हसवड पोलीस ठाण्याची हद्द सर्वात मोठी व तिन जिल्ह्याच्या हद्दीवरील असलेले हे म्हसवड पोलीस ठाणे तसे पाहिले तर काही गावे अतिसंवेदनशील आसल्याने त्याठिकाणी आठवड्यातून एक दोन तरी तक्रारी या गावात होत असतात यापूर्वी असलेल्या सपोनि राजकुमार भुजबळ यांनी म्हसवड पोलीस स्टेशनच्या इतिहासात अनेक अधिकारी आले व गेले त्यापैकी तिन ते चार अधिकार्या मध्ये भुजबळ साहेबांनी केलेले काम, गुन्हेगारी वर ठेवलेला अंकुश, दोन नंबरवर ठेवलेली पकड , पोलीस ठाण्याचा केलेला बदल हे सातारा जिल्ह्याच्या कायम लक्षात राहणारे काम केले

 असताना राजकारणाचा बळी गेलेले भुजबळ चार महिन्यानंतर जिल्ह्याच्या बाहेर हजर झाले असले तरी त्याचे काम मात्र कायम लक्षात राहणारे केले.



त्या पध्दतीचे काम सपोनि सखाराम बिराजदार साहेब यांचेकडून हजर होताच दोन नंबर व्यावसायिक यांची पळताभुई करुत आज गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्याची माहिती घेऊन वरकुटे मलवडी येथे रामोशी वस्ती, ओढ्याच्या बांधाऱ्याच्या अडोशाला काढीव हातभट्टी दारू भट्टीवर छापा कारवाई करून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरात असलेले रसायन 1800 लिटर व हातभट्टी दारू 80 लिटर एकूण किंमत 40000 जप्त करून जागीच नष्ट करून ७ आरोपीवर कारवाई करण्यात आली.


 तर काल बुधवार दिनांक ६ मार्च सांयकाळी ६ वाजता जांभुळणी तालुका माण गावचे हद्दीत छगन दादू कोकरे यांचे व्यापारी गाळ्या शेजारील आडोशाला कोंडीबा ज्योती पुकळे हा बेकायदा बिगर परवाना देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करण्याचे करत असल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांचेकडून तब्बल १४७० रुपयाचा माल ताब्यात घेतला मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला तर त्याच दिवशी जांभुळणी येथे रात्री ६.३० च्या दरम्यान

प्रल्हाद रंगनाथ काळेल हे स्वताच्या घराच्या आडोशाला बेकायदा बिगर परवाना देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःच्या जवळ १४०० रुपये किमतीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकून माल ताब्यात घेतला मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला तर जांभुळणी येथील तिसऱ्या कारवाई मध्ये मच्छिंद्र मारुती होळकर हा बेकायदा बिगर परवाना देशी व विदेशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वताचे ताब्यातील ४३४० रुपये किमतीची दारु विक्रीसाठी ठेवली होती.


पोलिसांनी धाड टाकताच आरोपी फरार झाला या चार कारवाई सपोनि सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघमोडे व पोलीस हवालदार नवनाथ शिरकुळे , वाहतूक हवालदार अनिल वाघमोडे, होमगार्ड यादव, सतिष जाधव, हवालदार लुबाळ व महिला पोलीस रुपाली फडतरे यांनी या कारवाई मध्ये सहभाग घेतला