*आरटीओतर्फे प्रवाशांच्या जनहितार्थ फलक जारी*

Admin
By -

 
*आरटीओतर्फे प्रवाशांच्या जनहितार्थ फलक जारी*

दहिवडी दि:आरटीओ सातारा यांच्यातर्फे प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी जनहितार्थ जागोजागी फलक लावले जात आहेत. त्याच अनुषंगाने दहिवडी बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रवासी आणि पादचारी व्यक्तींसाठी जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.

पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. त्यामुळे आपण अपघात टाळू शकता. अशी सावधानतापूर्वक सूचना देणारे एक छायाचित्र ही या फलकावर लावण्यात आले आहे.

त्याचबरोबर रस्त्यावर चालताना फुटपाथ वरून चालावे. फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे जेणेकरून समोरून येणारे वाहन आपल्याला स्पष्ट दिसेल अशा प्रकारच्या सूचना या फलकावर देण्यात आल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ अंतर्गत प्रवाशांचे सुरक्षितता आणि आरटीओतर्फे देण्यात येणाऱ्या नवीन सूचना लोकांना माहीत व्हाव्यात या अनुषंगाने असे फलक जागोजागी लावण्यात येत आहेत.

यावेळी दहिवडी आगाराचे आगार प्रमुख कपिल डुबल यांच्यासह परिवहनच्या कर्मचारी आणि आरटीओचे कर्मचारी उपस्थित होते.